कापसाला क्विंटलमागे ९०० रुपयांचा तोटा !

मुंबई – कापसासाठी ७ सहस्र २०० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. खुल्या बाजारात ६ सहस्र ३०० रुपयांचा दर मिळतो. हमीभावापेक्षा ९०० रुपयांनी अल्प भाव आहे. कापूस पणन महासंघाचे केंद्र अजूनही उघडलेले नाही. सीसीआयने मोजकी केंद्रे उघडली. शेतकरी केंद्रांवर गेले तर अटींची सूची दाखवली जाते. मग कापूस विकायचा कुठे ? याला कंटाळून वर्धा येथील शेतकर्‍याने गाडी भरून कापूस पेटवला. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची मोदी सरकारची गॅरंटी कुठे हरवली ?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, पांढरे सोने पिकवणारा प्रदेश म्हणून विदर्भाची ओळख आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कापसाला १४ सहस्र रुपये प्रतीक्विंटलचा दर मिळाला होता.