उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसमवेत घेतले श्री रामलल्लाचे दर्शन !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह आमदार आणि मंत्री

अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार आणि मंत्री यांच्यासह येथे श्रीराममंदिरात जाऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेतले. सर्व आमदार आणि मंत्री सकाळी ९ वाजता लक्ष्मणपुरी येथे बसद्वारे अयोध्येला मार्गस्थ झाले होते. अयोध्येत पोचल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.