पुणे – कोरोना महामारीमध्ये शहरातील व्यापार्यांवर नोंद केलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात सांगितले. २१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. त्या संदर्भातील परिपत्रक काढले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे. कोरोनामध्ये प्रशासनाला सहकार्य करत असतांनाही महाविकास आघाडीने व्यापार्यांवर गुन्हे नोंद केले होते. महायुती सरकारने गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता त्याची पूर्तता लवकरच होईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.