चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यात असलेल्या उजिरे येथील रूमन आल्दुरु हा मुसलमान नृत्य शिक्षक एका अल्पवयीन हिंदु मुलीला फिरवत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले. यावरून बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी रूमन याच्यावर आक्रमण केल्याचे सांगितले जात आहे. रूमन आल्दुरु हा एका खासगी महाविद्यालयात नृत्य शिक्षक म्हणून काम करतो. रूमन याच्याविरुद्ध मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. आल्दुरू पोलीस ठाण्यात रूमन, तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बजरंग दलाच्या ७ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ‘रूमन याला अटक झाली का ?’, हे आतापर्यंत समजू शकलेले नाही.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात ‘लव्ह जिहाद’ समर्थकांचे सरकार असल्याने अशा कारवायांविषयी आश्चर्य वाटायला नको ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !