श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍या मुसलमानबहुल भागातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरद्वारे कारवाई !

मेहसाणा (गुजरात) येथील घटना !

प्रतिकात्मक छायाचित्र

मेहसाणा (गुजरात) – येथील मुसलमानबहुल हटाडिया बाजारातील मशिदीजवळ २१ जानेवारीला भगवान श्रीरामाच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली होती. आता या परिसरात बुलडोझरद्वारे बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. हतारिया येथील पंचमुखी हनुमान मंदिर ते बेलीम वाडा अशी एकूण ३० ते ३५ अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. ‘या जागेच्या मालकीचा पुरावा सादर करावा किंवा स्वतः अतिक्रमण हटवा’, असे पालिकेने सांगितले होते; मात्र अतिक्रमण न हटवल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या वेळी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

  • जर अतिक्रमण झाले होते, तर आधीच त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? अतिक्रमण होत असतांना प्रशासन झोपले होते का ? हिंदूंवर आक्रमण झाल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार आहे का ?