Anti-Hindu Irfan Habib : (म्हणे) ‘पूजा स्थळ कायद्यामुळे काशी आणि मथुरा येथील मशिदी तशाच ठेवाव्या लागतील !’ – हिंदुद्वेषी इतिहासकार इरफान हबीब

 हिंदुद्वेेषी इतिहासकार इरफान हबीब यांचे विधान !

अलीगड (उत्तरप्रदेश) – काशी आणि मथुरा येथे पूर्वी मंदिरे होती. ती पाडली गेली, हे अगदी खरे आहे. याचा उल्लेख इतिहासाच्या अनेक पुस्तकांत आढळतो. हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची किंवा न्यायालयाची आवश्यकता नाही; परंतु त्यांचे सध्याचे स्वरूप १९९१ च्या पूजा स्थळ कायद्यानुसार संरक्षित आहे. त्यानुसार वर्ष १९४७ ची या ठिकाणांची स्थिती कायम ठेवावी लागेल. काही पालट करायचे असतील, तर कायदा पालटावा लागेल. ३००-४०० वर्षांनी या स्थानांमध्ये पालट करण्याचे औचित्य काय ?, असा प्रश्‍न हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे. (काशी आणि मथुरा येथील मंदिरे हिंदूंसाठी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने तेथील मशिदी पाडून पुन्हा मंदिरे बांधणे आवश्यकच आहे. त्यासाठी कोणत्याही औचित्याची आवश्यकता नाही ! – संपादक)

सौजन्य : Zee Uttar Pradesh UttaraKhand

‘मंदिरे बांधण्यासाठी भारतात सहस्रो बौद्ध विहार पाडण्यात आले, तेही तुम्ही पाडाल का ? गया येथील महाबोधी मंदिर हे याचे उदाहरण आहे. शैव धर्माच्या लोकांनी तेथे नियंत्रण मिळवले; मात्र आता तेथे हिंदु आणि बौद्ध दोघेही पूजा करतात. – इतिहासकार इरफान हबीब

(बौद्ध पूर्वी हिंदु होते आणि जेव्हा आदि शंकराचार्यांनी भारतात वैदिक सनातन धर्माची पुनर्स्थापना केली, तेव्हा तेच बौद्ध पुन्हा हिंदु झाले अन् त्यांनी पुन्हा बौद्ध मंदिरांच्या ठिकाणी हिंदु मंदिरे बांधली, असा इतिहासही सांगितला जातो. याविषयी इरफान हबीब का बोलत नाहीत ? – संपादक)

इतिहासकार इरफान हबीब यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. मोगल बादशाहांंपैकी औरंगजेबानेच मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. त्याच्या विरोधात उजव्या विचारसरणीचे गट सर्वाधिक आक्रमक होणे साहजिक आहे; पण आता हे अती झाले आहे. मंदिरे पाडण्याचे आदेश देण्यामागे औरंगजेबाचा हेतू काय असावा या प्रश्‍नाचे उत्तर केवळ धार्मिक लोकच देऊ शकतात. (सोयीनुसार इतिहास सांगणारे इरफान हबीब ! – संपादक) महमूद गझनी आणि तैमूरलंग यांनीही मंदिरे उद्ध्वस्त केली; पण ते राज्यकर्ते नव्हते, दरोडेखोर होते.

२. जवळजवळ सर्व मोगल बादशाहांनी मंदिरांना संरक्षण दिले. शाहजहान एक पाऊल पुढे जाऊन वृंदावनातील एका मंदिराविषयी म्हणतो की, ‘येथे देवाची पूजा केली जाते आणि त्याला साहाय्य केले पाहिजे.’ अकबर आणि जहांगीर यांनी मथुरेतील मंदिरांना अनुदान दिले. हे सर्व त्यांना औरंगजेबाच्या काळातही मिळाले. (असे होते, तर देशातील साडेतीन लाखांहून अधिक मंदिरे पाडून तेथे मशिदी, दर्गे कसे बनले ? याचे उत्तर हबीब देतील का ?  – संपादक)

३. अकबराने महंमद बिन कासिम (वर्ष ८१४) याने चालू केलेला मुसलमानेतरांकडून वसूल करण्यात येणारा जिझिया कर रहित केला होता. इतर कोणत्याही मोगल बादशाहाने अगदी औरंगजेबानेही जिझिया वसूल केल्याचा पुरावा नाही. ब्राह्मणांकडून जिझिया वसूल केला जात नव्हता. (‘खोटे बोला; पण रेटून बोला’ अशा मानसिकतेचे इतिहासकार इरफान हबीब ! औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लावला आणि वसूल केला, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला लिहिलेल्या पत्रात म्हटल्याचे इतिहासकाराच सांगत आहेत. – संपादक) 

संपादकीय भूमिका 

  • इस्लामनुसार ज्या ठिकाणी अन्य धर्मियांचे धार्मिक स्थान आहे, ते पाडून मशीद बांधणे अयोग्य आहे. असे असतांना मंदिरे पाडून मशिदी का बांधण्यात आल्या आणि त्या इस्लामनुसार अपवित्र असतांना त्या तशाच का ठेवाव्यात ?, हे हबीब यांनी सांगायला हवे !
  • इरफान हबीब, रोमिला थापर, आर्.एस्.शर्मा यांच्यासारख्या हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकारांनी भारताची वैचारिकदृष्ट्या हानी केली. अशा वैचारिक आतंकवाद्यांवर आता कारवाई होणे आवश्यक !