|
नवी मुंबई – लव्ह जिहादच्या प्रकरणात नेरूळ पोलीस ठाण्यामधून मुसलमान मुलाने हिंदु मुलीला पळवून नेल्याप्रकरणी सकल हिंदु समाजाने नेरूळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांचा निषेध केला.
या वेळी भाजपचे पदाधिकारी सतीश निकम म्हणाले की,
१. नेरूळ सेक्टर १५ मध्ये रहाणार्या मुलीला मुसलमान तरुणाने लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवले होते. या प्रकरणी मुलीचे पालक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते; मात्र पोलिसांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच वेळी या मुलीला मुसलमान तरुणाने पळवून नेले. यामध्ये पोलिसांनी मुलीला पळवून लावण्यात साहाय्य केले.
२. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांचा निषेध केला. अन्य एका प्रकरणात सानपाडा येथेही एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून नेण्यात आले. नवी मुंबईत अशी अनेक प्रकरणे घडत असतांना पोलीस कारवाई करत नाहीत.
A case of Hindu girl being abducted by a Mu$|!m from Nerul (Navi Mumbai) Police Station.
'Sakal Hindu Samaj' protest in front of the police station!
➡️The fact that Hindus have to organize a protest to make their voice heard, explains the inefficiency of Police – BJP
👉 In… pic.twitter.com/XK8xxTNKWF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2024
३. नेरूळ पोलीस कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ‘पीएफ्आय’चे कार्यालय होते. यावरून नेरूळ पोलिसांची अकार्यक्षमता सिद्ध होते. तेथे केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड घालून देशविरोधी कारवायांप्रकरणी मुसलमान तरुणांना अटक केली होती.
४. या परिसरात अनेक अवैध मशिदी आणि मदरसे निर्माण होत आहेत. नेरूळ स्थानकाजवळील मशिदीत शुक्रवारी नमाजामुळे वाहतूक कोंडी होते. या समाजाला पोलिसांचे विशेष संरक्षण आहे का ? हिंदु समाजाला रस्त्यावर यावे लागत आहे, ही शोकांतिका आहे.
नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी ‘या प्रकरणी गुन्हा नोंदवून मुलीला शोधण्यासाठी तपास पथक त्वरित पाठवण्यात येईल’, असे आश्वासन दिले.
संपादकीय भूमिकाअसे प्रकरण अल्पसंख्यांकांच्या विरोधात घडले असते, तर आज ते पोलीस ठाणे शिल्लक राहिले नसते ! |