Nijjar Murder Case : निज्जर प्रकरणात कॅनडा पुरावे देत नाही, तोपर्यंत त्याच्यासमवेत माहितीची देवाणघेवाण करणार नाही !

भारताने कॅनडाला पुन्हा सुनावले !

खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणात जोपर्यंत कॅनडाच्या अन्वेषण यंत्रणांनी गोळा केलेले पुरावे भारताला दिले जात नाहीत, तोपर्यंत भारत त्यांच्यासमवेत कोणत्याही माहितीची देवाणघेवाण करणार नाही, अशी स्पष्टोक्ती कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा यांनी केले. कॅनडातील ‘ग्लोब अँड मेल’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. १८ जून २०२३ या दिवशी कॅनडातील सरे येथे निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारत असल्याचा आरोप कॅनडाने केल्यापासून भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडले आहेत.

वर्मा पुढे म्हणाले की, आम्हाला या प्रकरणाशी संबंधित अचूक आणि ठोस पुरावे हवे आहेत. त्यानंतरच आम्ही कॅनडाच्या अन्वेषणात साहाय्य करू शकू. तसे झाले नाही, तर भारत या अन्वेषणात कॅनडाचे साहाय्य कसे करू शकेल ? आतापर्यंत मला अन्वेषणात  सहकार्य करण्याविषयी कॅनडाकडून कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही. भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचे षड्यंत्र कुणी रचले, तर त्याचे परिणाम नक्कीच समोर येतील, असे मला म्हणायचे आहे.

संपादकीय भूमिका

भारताने कॅनडाशी असेच वागणे आवश्यक आहे !