साधिकेला नामजप करतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि जाणवलेली सूत्रे !

कु. मधुरा चतुर्भुज

१. नामजप करतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य

‘१०.२.२०२२ या दिवशी मी संध्याकाळी ४.४५ ते ५.४५ या वेळेत नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘अनिष्ट शक्ती माझ्या दिशेने वेगाने काळी शक्ती सोडत आहेत. भुते आणि पिशाच ३ घंटे नाचत होते. माझ्यासमोर शिव रौद्र रूप धारण करत तांडव नृत्य करत आहे.’

२. आपत्काळाविषयी जाणवलेले सूत्र

तेव्हा मला जाणवले, ‘आता जो आपत्काळ येणार आहे, त्यात भीषण युद्ध होऊन अनिष्ट शक्तींचाही लय होणार आहे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेले महान कार्य !

साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होणार आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरी राज्याची स्थापना करणार आहेत. हिंदु राष्ट्र (रामराज्य) स्थापन करण्यासाठी समाजातील अनेक जण एकत्र आल्याने लवकर रामराज्य येईल. विष्णु आणि विष्णु म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले साधनेचा सुवर्ण काळ लवकरात लवकर आणणार आहेत. महर्षींच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे आयुष्यही वाढणार आहे.’

‘परात्पर गुरुदेवांची ईश्वरी राज्य स्थापनेची तळमळ सर्वांमध्ये येवो’, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा मोहन चतुर्भुज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक