हनुमान चालिसा लावल्याचा राग !
भावनगर (गुजरात) – येथे विश्व हिंदु परिषद आणि इतर हिंदु संघटना यांच्याशी संबंधित राजेंद्रभाई चौहान या शिवणकाम करणार्या हिंदु दुकानदारावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यात ते घायाळ झाले. हे आक्रमण चौहान यांनी हनुमान चालिसा लावल्यावरून साहिल, शौकत आणि मुन्ना यांनी केले. ही घटना १ फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली.
१. राजेंद्रभाई चौहान त्यांच्या दुकानात काम करत होते. त्याच वेळी शेजारी रहाणारे साहिल पदरशी आणि शौकत मंकड तेथे आले. त्या वेळी साहिलच्या हातात लोखंडी पाईप होता. दुकानात आल्यानंतर दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास चालू केले आणि पाईपद्वारे आक्रमण केले. यात त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झाली. यानंतर राजेंद्रभाई आरडाओरडा करू लागले आणि आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोचले. लोक येत असल्याचे पाहून धर्मांध तेथून पळून गेले.
२. राजेंद्रभाई चौहान यांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी शेजारी रहाणार्या शौकत याच्यासमवेत वाद झाला होता. यानंतर बिलालविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. मी माझ्या दुकानात हनुमान चालिसा ऐकत असतो. यावरून ६-७ महिन्यांपूर्वी आरोपींसोबत आमचे भांडण झाले होते. एकदा हनुमान चालिसा लावली असतांना आरोपीने येऊन टेपरेकॉर्डर बंद केला होता. येथील मुसलमान कुटुंब हनुमान चालिसाला विरोध करतात. अन्य कुणाचाही आक्षेप नव्हता. ३१ जानेवारी या दिवशीही हनुमान चालिसामुळे मारामारी झाली होती.
प्रथम माहिती अहवालामध्ये (एफ्.आय.आर्.मध्ये) हनुमान चालिसाचा उल्लेख नाही !
राजेंद्रभाई चौहान म्हणाले की, मी पोलिसांना सर्व माहिती दिली; परंतु त्यांनी प्रथम माहिती अहवालामध्ये हनुमान चालिसाचा उल्लेख केला नाही, मग मी काय करू ? या प्रकरणी काही पोलीस अधिकारी त्यांच्या घरी आले आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले.
याविषयी बोरतलाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि हे प्रकरण हाताळणारे के.सी. रेहवार यांनी सांगितले, सध्याच्या घटनेच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे त्यात हनुमान चालिसाचा उल्लेख नाही. दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. आम्ही अन्वेषण करत आहोत. त्यानंतरच संपूर्ण माहिती समोर येईल.
संपादकीय भूमिका
|