धारवाड (कर्नाटक) येथे हिंदु शेतकर्‍यावर मुसलमान व्यापार्‍यांकडून प्राणघातक आक्रमण !

‘तुम्हा हिंदूंना सोडणार नाही’, अशी धमकी

प्रतिकात्मक छायाचित्र

धारवाड (कर्नाटक) – येथील ए.पी.एम्.सी. मार्केटमध्ये लोकूर गावातून भाजी विकायला आलेल्या इरप्पा रुद्राप्पा उदिकेरी या शेतकर्‍यावर ५-६ मुसलमान व्यापार्‍यांनी प्राणघातक आक्रमण केले. घायाळ झालेल्या इरप्पा यांना धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. इराप्पा हे प्रतिदिन येथे येऊन भाजी विकून उदरनिर्वाह करत होते. ३ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे भाजी विकायला गेल्यावर या व्यापार्‍यांनी अनावश्यक वाद घालून हे आक्रमण केले. ‘तुम्हा हिंदूंना सोडणार नाही’ असे म्हणत त्यांनी आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकात काँग्रेसचे राज्य आल्याने ‘आमचे कुणी काहीही वाकडे करू शकणार नाही’, याच आर्विभावात धर्मांध मुसलमान वावरत आहेत. याविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !