‘मराठी भाषा दिना’निमित्त २५ फेब्रुवारी या दिवशी ‘संकल्प ग्रुप, मुंबई’ यांच्या वतीने निबंध स्पर्धा !

मुंबई – २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ संकल्प ग्रुप, मुंबई यांच्या वतीने रविवार २५ फेब्रुवारी या दिवशी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पश्चिम) येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत स्पर्धा होईल. या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ५ वी आणि ६ वी ते १० वी असे दोन गट असतील. प्रत्येक गटातून प्रथम ३ क्रमांकासाठी आणि सुंदर हस्ताक्षरासाठी असे एकूण ४ विजेते निवडले जातील. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप असून स्पर्धेनंतर लगेचच निकाल घोषित करून पारितोषिक वितरण करण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी ९५९४५९२४४३ /८९७५९२६८१४ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.