‘स्वतःसह इतर हिंदूंचाही घात करत आहोत’, याचे भान नसलेले जन्महिंदू !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेला हिंदू !

१. आतंकवाद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची मुसलमानांची मानसिकता !

‘आतंकवाद्यांच्या आतंकवादामुळे केवळ भारतच नव्हे, तर सारे जग त्रस्त आणि ग्रस्त आहे. विशेष म्हणजे काही इस्लामी राष्ट्रेही या आतंकवाद्यांच्या आतंकवादी कृत्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही इस्लामी राष्ट्रे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ‘सर्वच मुसलमान आतंकवादी नाहीत; पण सर्वच आतंकवादी मुसलमानच आहेत’, हे वास्तव वारंवार सूर्यप्रकाशाइतके स्वच्छपणे सिद्ध झाले आहे. भारतात आजपर्यंत जेवढे बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे झाली आहेत, ती सारी मुसलमान आतंकवाद्यांनीच केली, हेही निर्विवादपणे सिद्ध झाले आहे; पण आपल्या आतंकवादी असणार्‍या धर्मबांधवांच्या अमानवीय कृत्यांचा निषेध करण्यासाठी या देशातील मुसलमान समाज सामूहिकपणे कधीच रस्त्यावर उतरला नाही. इतकेच काय; पण पुष्कळच अल्प अपवाद सोडून कुणा मुसलमानाने आतंकवाद्यांचा साधा शाब्दिक निषेधही केला नाही. उलट या देशातील काही मुसलमानांनी आतंकवाद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यच केले. यावरून या देशातील मुसलमान समाजाची मानसिकता दिसून येते.

२. हिंदुद्वेष्ट्यांची मुसलमानांना खुश ठेवण्याची मानसिकता हिंदूंच्या मुळावर उठणारी !

श्री. शंकर गो. पांडे

मुसलमानांच्या या मानसिकतेपेक्षा अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या हिंदुद्वेष्ट्यांची मानसिकता अधिक राष्ट्रघातक आणि हिंदूंच्या मुळावर उठणारी आहे. प्रत्येक आतंकवादी कृत्यात केवळ आणि केवळ मुसलमानांचाच सहभाग अन् पुढाकार असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे नाईलाजाने काही होईना मुसलमान समाजाविरुद्ध बोलण्याची, मुसलमान आतंकवाद्यांना अटक करण्याची पाळी येते, हे वास्तव अपघाताने जन्मलेल्या हिंदु नेत्यांना सहन होत नव्हते. आतंकवाद्यांनी केलेले बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे यांमध्ये हिंदूंच्या वित्त अन् जीवित यांची किती प्रचंड प्रमाणात हानी झाली, सहस्रो हिंदूंचे संसार कसे कायमचे उद्ध्वस्त झाले, याचे यत्किंचितही दुःख अन् वैषम्य या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना होत नव्हते; पण वारंवार मुसलमान आतंकवाद्यांना अटक करावी लागत असल्यामुळे सर्व मुसलमान समाज आपल्यावर अप्रसन्न होतो कि काय ? स्वतःची परंपरागत मतपेढी गमावली जाते कि काय ? याची काळजी आणि भीती मात्र त्यांना सारखी सतावत होती; म्हणून हे नेते ‘काही उपद्रवी लोकांमुळे त्यांच्या धर्म आणि समाज यांची अपकीर्ती करणे योग्य नाही, कोणताच धर्म हिंसक नसतो, सर्वच धर्मांनी मानवता, प्रेम अन् शांती यांचा संदेश दिला आहे’, अशा काही वाक्यांचा सतत उच्चार करत होते. हा आलाप आळवण्यामागे ‘मुसलमान समाज रागवू नये’, हाच त्यांचा एकमेव उद्देश होता.

३. ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘आतंकवादी हिंदु’ या शब्दांचा शोध हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनीच लावणे !

पुढे पुढे हिंदुद्वेष्ट्यांना मुसलमान समाजाचे ते जे समर्थन आणि सांत्वन करत होते, तेही अपुरे वाटू लागले. मागील काही वर्षांत आतंकवाद्यांकडून करण्यात येणारे बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे यांचे प्रमाण सारखे वाढतच होते. मग या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी एक अभिनव क्लृप्ती शोधून काढली. काय होती ही क्लृप्ती ? तर ‘हिंदूही ‘आतंकवादी आहेत हे सिद्ध करणे !’, खोटे पुरावे उभे करणे. मग यासाठी एक षड्यंत्र या मुसलमानधार्जिण्या आणि हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी रचले. ‘भगवा आतंकवाद’ या एका नवीन शब्दांचा शोध त्यांनी लावला. ‘भगवा आतंकवाद’, ‘आतंकवादी हिंदु’ या शब्दांचा शोध काही मुसलमानांनी लावला नाही, तर त्यांना खुश करण्यासाठी काही हिंदु म्हणून अपघाताने जन्मलेल्या जन्महिंदु हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनीच लावला. मग ते हिंदुद्वेष्टे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असोत कि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे असोत, पी. चिदंबर्म असो कि दिग्विजय सिंह असोत.

४. सहिष्णु हिंदूंना आतंकवादी ठरवणार्‍या नेत्यांचे पाप कधी धुतले जाणार नाही !

अत्यंत सहिष्णु, अहिंसक आणि मानवतावादी म्हणून संपूर्ण जगात पुष्कळ पूर्वीपासून विख्यात असणार्‍या हिंदु समाजावर आतंकवादाचा शिक्का मारतांना या नेत्यांना ना जनाची लाज वाटली, ना मनाची. केवळ मुसलमान, ख्रिस्ती यांच्या मतांसाठी आणि सत्तेची भूक भागवण्यासाठी या नेत्यांनी हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे जे महापाप आणि नीच कर्म केले त्याची नोंद इतिहासात काळ्या अक्षरांनी कायमची झाली आहे. त्यांचे हे पाप कधीही धुतले जाणार नाही किंवा क्षमा केली जाणार नाही.

५. शांतीप्रिय हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी नेत्यांनी शोधला मार्ग !

हिंदूंनी अन्य धर्मियांना ठार करण्यासाठी कधीही बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे केली नाहीत. हातात ‘एके-४७’सारख्या बंदुका घेऊन अंदाधुंद गोळीबार करून अन्य धर्मियांना ठार केले नाही. हिंदूंना आतंकवादी ठरवावे, असे एकही कृत्य हिंदू किंवा त्यांच्या संघटनेने केले नाही. कोणत्याही हिंदु संस्था, संघटना, साधू-संत यांनी हिंदूंना आतंकवादाचे शिक्षण किंवा प्रशिक्षण दिले नाही. इतकेच काय; पण कधी असे गुप्तपणे किंवा उघडपणे साधे आवाहनही केले नाही; पण मग ‘अशा शांतीप्रिय, सुसंस्कृत आणि सभ्य असणार्‍या हिंदूंना आतंकवादी कसे ठरवायचे ?’, हा एक मोठा प्रश्न हिंदुद्वेष्ट्या नेत्यांसमोर उभा होता; पण यातूनही त्यांनी हा मार्ग काढला.

६. आतंकवादी अजमल अलीला सोडून देऊन ‘स्वामी असिमानंदां’ना खोट्या आरोपाखाली अटक

१८.२.२००७ मध्ये मध्यरात्री ‘समझौता एक्सप्रेस’ या रेल्वेमध्ये एक भीषण बाँबस्फोट झाला. ७० निष्पाप लोक यात ठार झाले. शेकडो प्रवासी घायाळ आणि कायमचे अपंग झाले. या बाँबस्फोटाचे सखोल अन्वेषण केल्यानंतर या बाँबस्फोटाचा प्रमुख सूत्रधार पाकिस्तानी आतंकवादी अजमल अली यास पकडण्यात आले; पण पुढे हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी एक षड्यंत्र रचले. १४ दिवसांच्या कारागृहवासानंतर अजमल अलीला सोडून देण्यात आले आणि हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी स्वामी असिमानंद या हिंदु संन्यासांवर खोटे आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. ‘स्वामी असिमानंद यांनीच समझौता एक्सप्रेस या रेल्वेत बाँबस्फोट घडवून आणला’, असा बनाव रचून ‘हिंदूही आतकंवादी आहेत’, अशी हिंदुद्वेष्ट्या नेत्यांकडून ओरड करणे चालू झाले.

हिंदुविरोधी आणि परकीय धनावर पोसल्या जाणार्‍या प्रसिद्धी माध्यमांनीही हिंदूंना आतंकवादी ठरवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली. पुढे स्वामी असिमानंद यांची निर्दाेष सुटका झाली; कारण हिंदुद्वेष्टे नेते सत्तेवरून पायउतार झाले होते. या स्फोटाचे अन्वेषण करणारे अधिकारी गुरुदीप सिंह आता निवृत्त झाले आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, ‘समझौता एक्सप्रेसमधील बाँबस्फोट अजमल अली यानेच केला होता’, हे मी भक्कम पुराव्यासहित सिद्ध केले होते; पण अचानक वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आलेल्या आदेशावरून अजमल अलीला कारागृहातून सोडून द्यावे लागले. अर्थात् वरिष्ठ अधिकार्‍यांवर त्या वेळच्या केंद्रातील हिंदुद्वेष्ट्या नेत्यांकडून प्रचंड दबाव आला असेल, हे सूज्ञास सांगणे न लगे !’

७. हिंदूंना आतंकवादी सिद्ध करण्याचा डाव आणि हिंदुद्वेष्ट्यांचे स्वप्न भंगणे !

वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हेही हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी रचलेल्या षड्यंत्रात फसले होते. या दोघांचा ‘त्यांनी न केलेला गुन्हा मान्य करावा’ म्हणून त्यांचा भयंकर असा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. हे दोघेही मनाने आणि शरिराने खंबीर होते म्हणूनच जिवंत राहू शकले, अन्यथा त्यांनी न केलेला गुन्हा मान्य केला असता, तर हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र यशस्वी झाले असते.

हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी समझौता एक्सप्रेसमधील बाँबस्फोटाच्या संबंधी रचलेले षड्यंत्र अयशस्वी झाल्यानंतर हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी परत एक षड्यंत्र रचले. २६ डिसेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये ८ ठिकाणी पाकिस्तानच्या १० आतंकवाद्यांनी एकत्रित आक्रमण केले. या आक्रमणात भारतीय आणि काही परदेशी अशा १९७ लोकांना प्राण गमवावे लागले. ८०० नागरिक गंभीर घायाळ झाले. वित्त हानी अपरिमित झाली. या आक्रमणासाठी भारतातील काही फितुरांनी पाकिस्तानी आतंकवाद्यांना आतून साहाय्य केले होते. या वेळी या आतंकवाद्यांनी त्यांची मूळ मुसलमान नावे पालटून हिंदु नावे धारण केली होती. हाताला भगवे गंडे बांधले होते; जेणेकरून ही आक्रमणे हिंदु आतंकवाद्यांनीच केली हे सिद्ध व्हावे; परंतु गीतेतील वचनाप्रमाणे हिंदूंच्या साहाय्याला प्रत्यक्ष ईश्वरच तुकाराम ओंबळे या पोलीस शिपायाच्या रूपात धावून आला. तुकाराम ओंबळे या शूर शिपायाने पाकिस्तानी आतंकवाद्यांपैकी अजमल कसाब नावाच्या आतंकवाद्याला स्वतःच्या प्राणाचे बलीदान देऊन जिवंत पकडले. नंतर अजमल कसाब याच्या कबुली जबाबातून ही आक्रमणे पाकिस्तानच्याच आतंकवाद्यांनी केल्याचे सिद्ध झाले आणि हिंदुद्वेष्ट्यांचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे हेही षड्यंत्र अयशस्वी झाले.

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/763506.html