कल्याण येथील माजी नगरसेवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – कल्याण पूर्व येथील कैलासनगर प्रभाग क्रमांक १०३ चे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा विकासक मनोज राय यांच्या विरुद्ध एका महिलेने बलात्काराचा आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे नोंद केला आहे. कल्याण पूर्वेतील राय रेसिडेन्सी या गृह प्रकल्पाचे मनोज राय हे मुख्य प्रवर्तक आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
१९ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या ‘फेज’चे उद्घाटन !

मुंबई – येथील कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे उद्घाटन १९ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमीटरच्या रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. १५ मेपर्यंत दोन्ही फेज चालू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
मुंबईत ६ ठिकाणी बाँब ठेवल्याचा संदेश प्राप्त !

मुंबई – येथे ६ ठिकाणी बाँब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या असून संदेश पाठवणार्याचा शोध घेतला जात आहे. याआधीही अनेकदा बाँब ठेवल्याच्या धमक्या पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या; परंतु त्या खोट्या असल्याचे उघड झाले आहे.
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू