पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केल्याचा भारतावर आरोप !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी भारताच्या विरोधात विष ओकले आहे. सैन्याच्या एका बैठकीला संबोधित करतांना ते म्हणाले की, भारताकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे घोर उल्लंघन केले जात आहे. त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला गेला पाहिजे.
India's flagrant violation of international laws. – #Pakistan's Army Chief
➡️ Accuses India of targeting Pakistani civilians.
👉 'The pot calling the kettle black,' typifies j!h@dist Pakistan. India should now make efforts to isolate Pakistan, a hub of j!h@dist #terrorism, from… pic.twitter.com/EtmCjgyUus
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 2, 2024
या बैठकीत भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना कथित लक्ष्य केल्याचाही उल्लेख करण्यात आला. जगभरातील अन्वेषण यंत्रणांनी या हत्यांविषयी आधीच गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कॅनडातील हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा उल्लेख न करता ते असे म्हणाले.
इस्रायल आणि हमास यांच्यातील तात्काळ युद्धबंदीसह पॅलेस्टाईनवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणीही या वेळी त्यांनी केली. अशीच तुलना त्यांनी काश्मीर प्रश्नाच्या संदर्भातही केली.
संपादकीय भूमिका
|