आळेफाटा (जुन्नर) येथील आरोपी पोलिसांना चुकवून वाहनातून बेडीसह पळाला !

प्रतीकात्मक छायाचित्र

जुन्नर – आळेफाटा पोलीस ठाण्याचा आरोपी जुन्नर येथून पोलिसांना चुकवून बेडीसह फरार झाला आहे. पोलीस अंमलदार भुजंग सुकाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्नर पोलिसांनी अजय तानाजी मुठे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत पोलीस कोठडीत असणार्‍या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जुन्नर येथील कारागृहात ठेवण्यासाठी घेऊन जात असतांना आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून अंधाराचा अपलाभ घेत हातकडीसह पळ काढला. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिजरे या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

आरोपी वाहनातून पोलिसांच्या तावडीतून पळून जातो, हे पोलिसांसाठी लज्जास्पद !