‘सनातनच्या आश्रमामध्ये राहून साधना केल्यावर साधकाची सर्वांगांनी आध्यात्मिक उन्नती होते. त्याला विविध प्रकारे लाभ होतो, उदा. स्वच्छता सेवा करण्यापासून सत्संग घेण्यापर्यंतच्या सर्व वर्णांच्या सेवा दिवसभरात करता येतात. प्रार्थना, कृतज्ञता, नामजप यांसारख्या कृतींच्या माध्यमातून भक्तीयोग, सत्संगातून शिकणे याच्या माध्यमातून ज्ञानयोग, अपेक्षारहित सेवा करणे यातून कर्मयोग आणि नामजपादी उपाय करणे यांच्या माध्यमांतून ध्यानयोग यांसारख्या विविध मार्गांनीही साधना होते. साधक एकमेकांना स्वतःच्या चुका सांगतात किंवा विचारतात. त्यामुळे सतत अंतर्मुख रहाता येते. सर्व साधक ‘मी येथे साधना करण्यासाठी आलो आहे’ या एकाच विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत असल्यामुळे आश्रमातील एकूण वातावरण साधनेसाठी पोषक होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.१.२०२४)