मुंबई – ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वर्ष २०२३ चा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.