पोवाडा म्हणणार्‍या विद्यार्थ्याला धर्मांध मुसलमानांनी माफी मागण्यास भाग पाडले !

  • अकोला येथील हॉमिओपॅथी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा म्हटल्याचे प्रकरण

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून धर्मांधांवर कारवाईची मागणी

महाविद्यालयात उपस्थित हिंदुत्ववादी कार्यकर्ते

अकोला – येथील हॉमिओपॅथी महाविद्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनात काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाड्याचे गायन केले. यावर महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि ते कार्यक्रमातून निघून गेले. ‘या पोवाड्यामुळे आमच्या भावना दुखावल्या’, असे सांगत त्यांनी पोवाडा गाणार्‍या विद्यार्थ्याला जाहीर माफी मागायला लावली. विद्यार्थ्यांनी गायलेला पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफझलखानाच्या वधाच्या प्रसंगावर आधारित होता.

सौजन्य तरुण भारत नागपूर 

या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला खडसावले. माफी मागायला भाग पाडणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. मनसेचे पंकज साबळे म्हणाले, ‘‘ज्या विद्यार्थ्यांनी पोवाडा गाणार्‍या विद्यार्थ्याला माफी मागायला लावली, त्यांना महाविद्यालयातून काढून टाकायला हवे.’’ अकोला येथील सनातन संघटनेचे मयूर मिश्रा म्हणाले, ‘‘अशा विद्यार्थ्यांवर कारवाईच व्हायला हवी.’’

संपादकीय भूमिका 

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांचे गुणगान करणारा पोवाडा म्हणण्यास विरोध व्हायला हा काय पाकिस्तान आहे का ? पोवाड्याला विरोध करून छत्रपतींचा अवमान करणार्‍यांनाच देशातून हाकलून द्यायला हवे !