शाळांमध्ये आयुर्वेद शिकवा ! युद्धकाळात आयुर्वेदाची औषधे उपलब्ध असतील ! 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘भावी पिढी निरोगी रहावी, यासाठी केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाची असलेली ‘होमिओपॅथी फॉर स्कूल’ ही ३ वर्षांची योजना गोव्यातील शाळांमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना तपासून त्यांना आवश्यकता भासल्यास औषधे दिली जाणार आहेत आणि शाळांमध्येच चिकित्सालय चालू केले जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. पर्वरी येथील ‘एल्.डी. सावंत मेमोरियल विद्यालय’, ‘विद्या प्रबोधिनी विद्यालय’, बांबोळी येथील डॉ. हेडगेवार विद्यालय आदी विद्यालयांमध्ये ही योजना राबवली जात आहे.’ (२४.१.२०२४)