मालाड येथील नाल्यात नवजात बालिका आढळली !

मुंबई – मालाड पूर्व येथील जीतेंद्र क्रॉस रोडवरील यादव तबेल्याच्या शेजारी असलेल्या नाल्यामध्ये २७ जानेवारी या दिवशी एक बाळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ती नवजात मुलगी असल्याचे लक्षात आल्यावर या बाळाला नाल्यातून काढून जवळील म.वा. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी अज्ञात पालकांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.