‘आयडॉल’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत वेगळ्याच विषयाचे प्रश्न !

मुंबई – विद्यापिठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एम्.एम्.एस्.) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्राची परीक्षा होती. ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ विषयाचा पेपर २३ जानेवारीला होता. प्रश्नपत्रिकेत पहिल्या सत्रातील ‘फायनान्शिअल अकाऊंट’ या विषयाचे प्रश्न देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले. परीक्षेसाठी ३ प्रश्नपत्रिकांचा संच सिद्ध ठेवणे अपेक्षित असते; मात्र विद्यापिठाने केवळ एकच संच केला होता. त्यातही चुका होत्या.