अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश !

मराठा आंदोलनाच्या विरोधाचे प्रकरण

गुणरत्न सदावर्ते

मुंबई – मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर न्यायालयाने सदावर्ते यांना वरील आदेश दिले.