स्वयंवर झाले सीतेचे !

शिवधनुष्य उचलण्याचा ‘पण’ जिंकल्यावर श्रीरामाचा जनककन्या सीतेशी विवाह !

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू (धनुष्य) शंकराचें । पूर्ण जाहले जनकराजाचे हेतु अंतरींचे । अंश विष्णूचा श्रीराम, धरेची दुहिता ती सीता । सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे । आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ।।