रत्नागिरी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आधी झालेल्या वाहनफेरीच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. दीपा औंधकर

१. हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारानिमित्त वाहनफेरी असतांना ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायचे आहे’, असा प्रयत्न करण्याचे ठरवणे

‘३.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होती. त्या सभेच्या प्रचारानिमित्त ३०.११.२०२२ या दिवशी वाहनफेरी होती. त्या दिवशी सकाळपासून मी ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायचे आहे’, असा प्रयत्न करण्याचे ठरवले.

२. धर्मध्वजपूजन होत असतांना आलेल्या अनुभूती वाहनफेरी आरंभ होण्याआधी धर्मध्वज पूजन झाले.

अ. धर्मध्वजाच्या ठिकाणी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरणकमल दिसत होते. ‘ते प्रत्यक्ष तिथे उभे आहेत आणि त्यांच्या चरणांची पूजा होत आहे’, असे मी अनुभवत होते.

आ. ‘माझ्या ठिकाणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आहेत. त्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि वाहनफेरी यांसाठी प्रार्थना करत आहेत’, असे मी अनुभवत होते.

३. वाहनफेरीत केलेला भावजागृतीचा प्रयोग

मी संपूर्ण वाहनफेरीत ‘गुरुदेवांच्या चरणपादुका मस्तकावर ठेवल्या आहेत आणि चरणपादुकांमधून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग केला.

‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेने मला तुमचे अस्तित्व अनुभवता आले. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. दीपा अमित औंधकर, रत्नागिरी (३०.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक