Bhagwant Mann Death Threat : खलिस्तान आतंकवादी पन्नू याने दिली पंजाबचे मुख्यंमत्री भगवंत मान यांना ठार मारण्याची धमकी !

पंजाबचे मुख्यंमत्री भगवंत मान व लिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू

नवी देहली – अमेरिकेतून खलिस्तानवादी कारवाया करणारा सिख ऑफ जस्टिस या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री मान यांना धमकी देतांना पन्नू याने सर्व गुंडांना २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनााच्या निमित्ताने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, गुंडांच्या विरोधात आम्ही कडक धोरण अवलंबले असून अनुचित प्रकार करणार्‍यांना कडक शिक्षा करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

पन्नू याच्या कथित हत्येच्या कटावरून भारतियाला अटक करणारी अमेरिका भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याची, भारतातील एका मुख्यमंत्र्याला ठार मारण्याची धमकी देणार्‍या पन्नूला मात्र अटक करत नाही, हा तिचा दुटप्पीपणे आहे, हे लक्षात घ्या ! अशा अमेरिकेवर भारताला कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही !