श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी हिंदू वर्गणी गोळा करत असतांना धर्मांध आक्रमक
उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथील गोताखोर या मुसलमानबहुल भागात गुंड काले खान आणि त्याचे साथीदार यांंनी दगड आणि विटा यांद्वारे केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचे नेते विनोद कश्यप ठार झाले. यात त्यांचे भाऊ दुर्गाशंकर कश्यप हे घायाळ झाले.
येथे हिंदू अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी वर्गणी गोळा करत असतांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. त्या वेळी काले खान याने त्यांचा विरोध केला. या वेळी दोन्ही गटांमध्ये वाद झाला. काले खान याने हिंदूंकडून वर्गणीचे पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला हिंदूंनी विरोध केल्यानंतर काले खान आणि त्याचे समर्थक यांनी दगडफेक केली. याची माहिती मिळाल्यानंतर विनोद कश्यप तेथे पोचले. त्यांना काले खान याने दगड आणि विटा यांद्वारे मारहाण करत ठार केले. या हिंसाचाराच्या वेळी गोळीबार करण्यात आल्याचाही आरोप केला जात आहे. या घटनेनंतर हिंदूंनी येथील रस्ता बंद आंदोलन केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, अशीच हिंदूंना अपेक्षित आहे. |

मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !