‘मालदीवमध्ये प्रतिवर्षी जेवढे पर्यटक येतात, त्यातील १४ टक्के, म्हणजे सर्वाधिक पर्यटक हे रशिया आणि युरोप येथून येतात. त्याच्या खालोखाल भारताचा क्रमांक येतो. त्याचप्रमाणे मालदीव भारताकडून प्रतिवर्षी अनुमाने अर्धा अब्ज रुपयांच्या (अनुमाने ५० कोटी रुपयांच्या) वस्तू आयात करतो. हे बेट भारतावर अवलंबून असल्यामुळे भारताला हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळावा लागेल. अन्यथा याचा लाभ चीन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक