नाशिककरांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत !

नाशिक येथील रोड शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक – राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहस्रो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. या वेळी त्यांनी जीपमधून ‘रोड शो’ केला. कला-संस्कृती यांचे प्रदर्शन घडवत अनेक पथकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.