सौदीच्या राजकुमारावरच केली टीका !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोक आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला. या वेळी त्या मुसलमानांसाठी पवित्र असणार्या मदिना येथेही गेल्या होत्या. मदिना येथे जातांना महिलांनी डोके झाकण्यासाठी हिजाब परिधान करण्याचा इस्लाम आणि सौदी अरेबिया यांचा नियम आहे. डोक न झाकता येणार्या महिलांना शिक्षा केली जाते. स्मृती इराणी यांनी साडी परिधान केली होती; मात्र त्यांनी डोके हिजाब किंवा अन्य कोणत्याही वस्त्राने झाकले नव्हते. याविषयी सौदीच्या सरकारने कोणतीही आडकाठी आणली नसली, तरी पाकिस्तानला यावरून मिरच्या झोंबल्या आहेत. त्याने सौदी अरेबियावर टीका केली आहे.
(सौजन्य : The Abhishek Tiwary Show)
१. पाकिस्तानी नागरिकांनी सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांच्यावर टीका करतांना म्हटले की, ते केवळ पैशांकडे पहात आहेत. त्यांनी मशीद आणि थडगे यांना पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. त्यांच्यासाठी केवळ पैसेच सर्वकाही आहे. हे चांगले नाही. त्यांना समजले पाहिजे की, त्यांच्या देशाशी जगभरातील मुसलमान श्रद्धाने जोडले आहेत.
२. दुसरीकडे काही पाकिस्तान्यांनी या विषयावरून पाकिस्तान आणि भारत यांची तुलना करतांना भारताच्या प्रगतीचे कौतुकही केले आहे. पाकिस्तान्यांचे म्हणणे आहे की, जग पालटत आहे. सौदी अरेबिया स्वतःच्या लभाचा विचार करत आहे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे. यामुळे कुणीही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सौदी अरेबिया त्याच्या जुन्या परंपरांतून स्वतःला बाहेर काढत आहे. तो त्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करण्याचा विचार करत आहे. यातूनच स्मृती इराणी यांच्या दौर्याकडे पाहिले पाहिजे.
३. एका पाकिस्तान्याने म्हटले की, आपण इतरांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःकडे पाहिले पाहिजे. भारताने स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात येथे मंदिरे बांधली जात आहेत. तेथील राजे भारताचा दौरा करत आहेत. प्रत्येक देश स्वतःचा लाभ पहात आहे. चीनही व्यापाराच्या दृष्टीने भारताशी जवळीक साधत आहे. कुणीही भारतासारखी बाजारपेठ गमावू इच्छित नाही.