Maharashtra No 1 In cleanlyness : स्वच्छ राज्यांच्या सूचीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक !

स्वच्छ शहरांच्या सूचीत नवी मुंबई तिसर्‍या क्रमांकावर !

मुंबई – स्वच्छ राज्यांच्या सूचीत महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर स्वच्छ शहरांच्या सूचीत नवी मुंबई हे शहर तिसर्‍या क्रमांकावर आहे. स्वच्छ राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, मध्यप्रदेश दुसर्‍या, तर छत्तीसगड तिसर्‍या क्रमांकावर आहे. देहली येथील पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहरे आणि राज्य यांच्या प्रतिनिधींना पुरस्कार दिले आहेत.

१. स्वच्छ शहरांच्या सूचीत प्रथम क्रमांक इंदूर (मध्यप्रदेश), तर सूरत (गुजरात) दुसर्‍या क्रमांकावर आहे.

२. ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन’ अंतर्गत वर्ष २०१६ पासून प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. वर्ष २०२३ च्या पुरस्कारांमध्ये ४ सहस्र ४१६ शहरी स्थानिक संस्था, ६१ छावण्या आणि ८८ छोटी शहरे समाविष्ट आहेत.