पुणे – शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे. पोलीस या प्रकरणाचे योग्य ते अन्वेषण करत आहेत. शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते, ती चुकीची आहे. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले ? याची कुणाला माहिती नाही. त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये, अशी मी विनंती करतो, असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती यांना भेटायला गेले असतांना बोलत होते.
माझे पती हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळेच त्यांची हत्या झाली ! – स्वाती मोहोळ
माझे पती हिंदुत्वनिष्ठ होते, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. माझे पती वाघ होते आणि मी वाघीण आहे. या हत्येमुळे मी खचून जाणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्ववादासाठी काम करणार आहे, असे परखड मत स्वाती मोहोळ यांनी व्यक्त केले. स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत.