मुंबई – राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणांमधील पाणी अल्प होत आहे. एका आठवड्यात धरणांतील पाणीसाठा २ टक्क्यांनी घटला आहे. डिसेंबरच्या अखेरीस राज्यभरात ६३ टक्के पाणीसाठा होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तो ६१ टक्के झाला आहे.
सध्या ९६१ वाड्यांना, तर ३६६ गावांना जवळपास ४०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात पाऊस न पडल्याने तेथील शेतकर्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वात बिकट असून त्याखालोखाल नागपूर विभागातील पाणीसाठा अल्प आहे.