तरुणांमधील संयम संपत असल्याचे दुर्दैवी उदाहरण !
सातारा, २९ डिसेंबर (वार्ता.) – काही तरुण कमानी हौदाजवळ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसले होते. त्या वेळी तेथून जाणार्या एकाने ‘गाडी बाजूला घे’, म्हटल्याच्या कारणावरून २ गटात वादावादी होऊन हाणामारी झाली. या वेळी एकाने हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांना तेथे बंदुकीची रिकामी पुंगळी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण करत संबंधित युवकाला पहाटे ४ वाजता त्याच्या घरातून कह्यात घेतले. मारहाणीमध्ये घायाळ झालेल्यांना पोलिसांनी रुग्णालयात भरती केले आहे.