‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार मंदिर समितीच्या वर्ष २०२१-२२ च्या लेखा परीक्षण अहवालातून उघड झाला आहे. श्री विठ्ठलाच्या २०३, तर श्री रुक्मिणीदेवीच्या १११ प्राचीन दागिन्यांच्या नोंदीही ताळेबंदामध्ये नोंदवण्यात आलेल्या नाहीत. यासह मंदिरातील गरुडखांब, सभा मंडपाचे दरवाजे, तसेच श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीदेवी यांच्या मुख्य गाभार्यांचेही मूल्यांकन केलेले नसल्याचा धक्कादायक प्रकार अहवालातून उघड झाला आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार संशयास्पद असून यातून दागिने हडप झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.’
(२४.१२.२०२३)