DMK Dayanidhi Maran : उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील हिंदी लोक तमिळनाडूत शौचालय स्वच्छ करतात !

द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांचे विद्वेषी विधान !

द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन

चेन्नई (तमिळनाडू) – उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतून येणारे लोक तमिळनाडूमध्ये बांधकाम प्रकल्प, रस्ते आणि शौचालय साफ करण्याचे काम करतात, असे विधान द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन एका भाषणामध्ये केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. खासदार मारन यांनी यात पुढे म्हटले आहे की, इंग्रजीचे शिक्षण घेतलेले माहिती आणि तंत्रज्ञान आस्थापनांमध्ये काम करतात, तर हिंदी शिकलेले क्षुल्लक कामे करतात.

‘इंडी’ आघाडीचे नेते आता गप्प का ? – भाजपचा प्रश्‍न

भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी खासदार मारन यांच्या विधानावर ट्वीट करून म्हटले की, उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन राज्यांतील ‘इंडी’ आघाडीचे नेते या वक्तव्यावर का बोलत नाहीत ? नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव, काँग्रेस, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे ‘काहीच घडले नाही’, असे का वागत आहेत? ते याविषयी काही भूमिका घेणार आहेत कि नाही ? विरोधकांची ‘इंडी’ ही आघाडी भारतातील लोकांना जात, भाषा आणि धर्म यांच्या आधारावर विभागणी करत आहे. पुन्हा एकदा भारतामध्ये फूट पाडून राज्य करण्याची खेळी खेळली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • सनातन धर्माला ‘दलितांचा द्वेष करणारा धर्म’ असे म्हणत तो नष्ट करण्याची भाषा करणार्‍या द्रमुक पक्षाच्या नेत्यांचीच वृत्ती किती हीन आहे, हे लक्षात घ्या !
  • प्रमाणिकपणे आणि चरितार्थासाठी कोण काय काम करतो ? यावरून त्यांची पात्रता ठरत नाही, हे खासदार मारन यांना ठाऊक नाही का ? अशा प्रकारच्या विधानाद्वारे ते लोकांना तुच्छ लेखत आहेत, हे त्यांना निवडून देणार्‍या तमिळनाडूतील जनतेला मान्य आहे का ?