बजरंगी यांच्या भावाची प्रकृती चिंताजनक !

नूंह (हरियाणा) – येथे श्रावण मासामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गोरक्षक बिट्टू बजरंगी यांचा भाऊ महेश पांचाल यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ते ६० टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील एका आरोपीचे नाव अरमान आहे. त्याने महेश यांना विचारले, ‘तू बिट्टू बजरंगी याचा भाऊ आहेस का ?’ यावर महेश यांनी ‘हो’ असे उत्तर दिल्यावर अरमान आणि त्याचे साथीदार यांनी महेश यांच्यावर पेट्रोल ओतून आग लावली.
बिट्टू बजरंगी यांच्यावर २ मुसलमान गोतस्करांना एका वाहनामध्ये जिवंत जाळून मारल्याचा आरोप आहे. त्यावरूनच त्यांच्या भावावर हे आक्रमण झाल्याचे म्हटले जात आहे.
(सौजन्य : City Tehelka)
संपादकीय भूमिकाहरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना गोरक्षकांच्या कुटुंबियांवर धर्मांधांकडून अशा प्रकारची आक्रमणे होणे हिंदूंना अपेक्षित नाही. धर्मांधांचे यापुढे असे धाडस होणार नाही, अशी वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! |
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !