खोपोली (जिल्हा रायगड) – खोपोलीतील ‘एम् डी’ हा अमली पदार्थ बनवणार्या कारखान्यावर पोलिसांनी धाड घातली आहे. मौजे ढेकू गावच्या हद्दीत ‘इंडिया पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ असा फलक लावून ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. यामध्ये १०६ कोटी ५० लाख रुपयांचे ‘एम् डी’ पोलिसांनी जप्त केले आहे, तसेच ३ फरार आरोपींनाही अटक केली आहे.
संपादकीय भूमिकासमाजाला व्यसनाधीन करणार्या संबंधितांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! |