वणी-मुकुटबन (जिल्हा-यवतमाळ), ६ डिसेंबर (वार्ता.) – येथील स्थानिक गुन्हे शाखेने येडशी आणि मांगली या दोन गावी संयुक्त सापळा रचून ३० गोवंशियांची मुक्तता केली. गोपनीय माहितीच्या आधारे या दोन मार्गांनी तेलंगाणा राज्यात हत्येसाठी नेणार्या ३० गोवंशियांना मुक्त करून गोरक्षण संस्थान, रासा, तालुका वणी येथे सुरक्षित ठेवण्यात आले. या वेळी ८ गोतस्करांना अटक करण्यात आली. यासमवेत चारचाकी वाहन आणि भ्रमणभाष आदी मिळून ६ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संपादकीय भूमिकागोतस्करांवर बरेचदा कारवाई होत असूनही गोतस्करी अखंड चालूच कशी रहाते ? गोतस्करांना कठोर शिक्षा होत नाही कि त्यांना जामिनावर सोडून देण्यात येते ? गोतस्करी कायमची बंद होण्यासाठी उपाययोजना काढण्यात प्रशासन न्यून का पडते ? |