
नवी देहली – भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली असून पंजाबमध्ये गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांचे गुप्तचर यांनी तिची अनेक घंटे चौकशी केली. पोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याविषयी विचारणा केल्यावर ती म्हणाली की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. ती तिच्या दोन्ही मुलांना समवेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या दोन्ही मुले अरविंद समवेत रहातात.
चौकशीत अंजूने सांगितले की, ती २१ जुलै या दिवशी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी नागरिक नसरुल्लासमवेत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिस्ती धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर इस्लामी रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्न केले; मात्र सध्या तिच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र नाहीत. तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचार्याशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कुणाला ओळखत नाही.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !