हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती पाद्र्यांची क्लृप्ती !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

ख्रिस्ती धर्मप्रचारक कोणत्या सीमेपर्यंत खोटारडेपणाचा आधार घेऊ शकतात, याचे एक ज्वलंत उदाहरण, म्हणजे छत्तीसगडच्या जांजगीर जिल्ह्यात ज्याचे नाव स्वदेशी (सेवा बाबा, सेवाश्रम), वेश स्वदेशी आणि कर्म मात्र धर्मांतर करणे, अशा पाद्री जोसेफ परेकाट्टिलचे प्रकरण उजेडात आले. त्याने स्वतःचे नाव ‘सेवाबाबा’ असे धारण केले आहे. तो भोळे भाबडे हिंदू आणि आदिवासी यांना हिंदु प्रवाहापासून वेगळे करतो अन् नंतर त्यांचे धर्मांतर करण्याचे दुष्कर्म करत आहे. कितीतरी आदिवासींची फसवणूक करून त्यांना ख्रिस्ती केले आहे.

वास्तविक तो ‘सेवाबाबा’ नाही आणि त्याचा आश्रम हिंदूंचा ‘सेवाश्रम’ही नाही. हे सत्य उजेडात आणणार्‍याने सांगितले आहे की, वास्तविक तो पाद्री जोसेफ परेकाट्टिल आहे आणि तो म्हणतो, ‘‘मी एखाद्या हिंदु संतांसारखे पवित्र जीवन जगण्याची इच्छा करतो; म्हणून मी हा वेश परिधान केला आहे.’’ केवळ साधूचा वेश धारण केल्यावर त्याचे जीवन पवित्र होत नाही; उलट त्याने भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी हे साधूचे सोंग घेतले आहे, जेणेकरून तो हिंदूंना प्रभावित करू शकेल आणि त्यांना हिंदु धर्मापासून तोडून त्यांचे धर्मांतर करणे त्याला सोपे होईल.

येथे आलेल्या नवागढच्या ३५ वर्षे वयाच्या जानकीबाईंच्या हे लक्षात आले की, हिंदूंनी कपाळावर कुंकू लावलेले पहाताच ख्रिस्ती लोक त्यांना अडचणीत आणण्यास आरंभ करतात. त्यामुळे ती आता कपाळावर कुंकू लावत नाही. ‘धर्मांतराच्या दिशेने पडणारे हे पहिले पाऊल’, असे म्हटले जाते.

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६)

(ही परिस्थिती आजपासून १७ वर्षांपूर्वीची आहे, तर आजची स्थिती काय झाली असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. – संपादक)