उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदींवरील शेकडो भोंग्यांवर कारवाई !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश)- उत्तरप्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात अभियान राबवून कारवाई चालू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली. यात नियमापेक्षा अधिक मोठा आवाज ठेवणे, अनुमतीविना भोंगे लावणे आदी गोष्टी समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. यात शेकडो भोंगे जप्त करण्यात आले आहेत.


१. या अभियानाचा प्रारंभ २७ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजल्यापासून करण्यात आला. लक्ष्मणपुरीतील तकियावाली मशिदीसमवेत अनेक भागांतील नियमभंग करणार्‍या मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले. अशा प्रकारे कानपूर, हमीपूर, चित्रकूट, अयोध्या आदी जिल्ह्यांमध्येही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या वेळी न्यायादंडाधिकारीही उपस्थित होते.

२. प्रतापगड जिल्ह्यात ३५० मशिदींवर बेकायदेशीरित्या भोंगे लावण्यात आले होते. यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद केले आहेत. कौशांबी जिल्ह्यामध्ये २०३ ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले. तसेच काही मशिदींच्या ठिकाणी वीज चोरी करण्यात आल्याचेही या वेळी उघडकीस आले. फारूखाबाद जिल्ह्यात ४६ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यासह ललितपूर, कन्नौज, फतेहपूर आणि औरेया या जिल्ह्यांमध्येही कारवाई करण्यात आली.

३. काही जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षकांनी मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांसमवेत बैठक घेतली. यात त्यांना सरकारी नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले. मशिदींप्रमाणेच काही मंदिरे आणि मठ येथील नियमभंग करणार्‍या भोंग्यांवर कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?