कनवीन जमियत उलेमा यांचा विरोध
(‘फॅशन शो’मधील ‘कॅटवॉक’ म्हणजे वेगवेगळ्या वेशभूषा करून ती मंचावरून चालून प्रेक्षकांना दाखवणे.)
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील ‘श्रीराम ग्रुप ऑफ कॉलेज’ येथे मुसलमान तरुणींना एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. या वेळी अभिनेत्री मंदाकिनीही उपस्थित होत्या. या वेळी काही मुसलमान तरुणींनी बुरखा घालून फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
या घटनेविषयी कनवीन जमियत उलेमा मौलाना मुकर्रम कासमी यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बुरखा घालून फॅशन शोमध्ये कॅटवॉक करणे चुकीचे आहे; कारण बुरखा महिलांसाठी गौरवाची गोष्ट आहे. बुरखा फॅशन शोसाठी नाही. महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक यांनी अशा प्रकारचे कृत्य केल्याने मुसलमानांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे अशा गोष्टींपासून वाचले पाहिजे. जर अशा प्रकार पुन्हा झाला, तर आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करू.
संपादकीय भूमिकाया विरोधाविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ? |