व्हँकुव्हर (कॅनडा) येथे पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल याच्या घरावर गोळीबार

  • फेसबुक पोस्ट करून कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई याने घेतले गोळीबाराचे दायित्व !

  • अभिनेता सलमान खान यालाही दिली धमकी

डावीकडून गिप्पी ग्रेवाल आणि लॉरेन्स बिश्‍नोई

व्हँकूव्हर (कॅनडा) – येथील व्हाईट रॉक परिसरात पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंनर काही वेळातच कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई याच्या नावाने फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित करत या घटनेचे दायित्व त्याने स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
या पोस्टमध्ये लॉरेन्स याने थेट ग्रेवालला सांगितले की, तुम्ही सलमान खान याला तुमचा भाऊ मानता; पण आता तुमच्या भावावर तुम्हाला वाचवण्याची वेळ आली आहे. हा संदेश सलमान खानसाठीही आहे. दाऊद त्यांना वाचवेल, या भ्रमात त्यांनी राहू नये. तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूवर तुमची नाट्यमय प्रतिक्रिया दुर्लक्षित झालेली नाही. तो कोणत्या प्रकारचा माणूस होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आता तुम्ही आमच्या ‘रडार’वर आला आहात, हा ‘ट्रेलर’ समजा. पूर्ण चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही देशात जा; पण लक्षात ठेवा, मृत्यूला व्हिसा लागत नाही, तो विनानिमंत्रित येतो.

सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड