संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन संमत !

अपत्यप्राप्तीविषयी केलल्या वक्तव्याचे प्रकरण !

इंदोरीकर महाराज

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – अपत्यप्राप्तीविषयी केलल्या वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाकडून २० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत झाला आहे. पी.सी.पी.एन्.डी.टी. कायद्याअंतर्गत इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

२४ नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती; पण या दिवशी इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्यामुळे महाराजांनी न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयाने एक दिवस अगोदर जामीन संमत केला, अशी माहिती इंदोरीकर महाराजांचे अधिवक्ता के.डी. धुमाळ यांनी दिली.