|
कौशांबी (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील देर्हा गावात २१ नोव्हेंबरच्या सायंकाळी एका २० वर्षीय तरुणीची कुर्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. अशोक आणि पवन निषाद या दोघा भावांनी तरुणीची हत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शी गावकर्यांनी सांगितले. यातील अशोक हा एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असून सध्या जामिनावर आहे. त्याचा भाऊ पवन याने ३ वर्षांपूर्वी तरुणीवर बलात्कार केला होता. त्याच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरण महेवाघाट पोलीस ठाण्याच्या सीमेतील आहे.
१. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुणीवर रस्त्यावर धारदार कुर्हाडीने वार करत होते. या वेळी तेथे उपस्थित लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
२. पवनने तरुणीवर ३ वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. त्याच्या विरोधात न्यायालयात खटलाही चालू होता. पवन पीडितेच्या कुटुंबियांवर खटला मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता, तसेच तरुणीला जिवे मारण्याची धमकीही देत होता. (या प्रकरणी पोलिसांनी पीडिता आणि तिचे कुटुंबीय यांना संरक्षण का दिले नाही ? त्यामुळे या घटनेला पोलीसही उत्तरदायी आहेत, असे म्हणायचे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाबलात्कार्याला त्वरित शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तत्परतेने प्रयत्न न केल्याचाच हा परिणाम आहे ! |

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !