डाळींमध्ये किडे, तर रव्यामध्ये जाळ्या आढळल्या
पुणे – गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिलेला ‘आनंदाचा शिधा’ हा खाण्यास अयोग्य आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या आणि निकृष्ट दर्जाच्या पामतेलाचे वाटप करण्यात आले आहे. असा निकृष्ट ‘आनंदाचा शिधा’ देऊन सरकारने गरिबांची थट्टा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी ‘फेसबुक’ या सामाजिक माध्यमावर निकृष्ट धान्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. तसेच ‘आनंदाचा शिधा’मध्ये देण्यात येत असलेल्या साहित्याच्या वेष्टनावरील मुद्रित केलेल्या वजनापेक्षा अल्प वजनाचे साहित्य मिळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
संपादकीय भूमिकासंबंधित उत्तरदायींचे दायित्व निश्चित करून सरकार त्यांच्यावर लवकर कारवाई करणार का ? |