सौंदत्ती यात्रेच्‍या कालावधीत बसगाड्यांचे दर गतवर्षीप्रमाणे असावेत ! – कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेचे निवेदन

राजेश क्षीरसागर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्‍हापूर – डिसेंबरमध्‍ये होणार्‍या कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी भाविकांनी बसगाड्यांकडे दर पत्रकाची मागणी केली होती. या संदर्भात कोल्‍हापूर येथील अधिकार्‍यांनी यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे सांगितले होते. वास्‍तविक ही यात्रा ४ दिवस भरते आणि त्‍यासाठी बसगाड्यांचा व्‍यय ८० सहस्र रुपयांपर्यंत आहे. त्‍याखेरीज पूर्वी ४५ असलेली आसनव्‍यवस्‍था आता ४२ झाली आहे. त्‍यामुळे हा व्‍यय भाविकांना परवडणारा नसल्‍याने सौंदत्ती यात्रेच्‍या कालावधीत बसगाड्यांचे दर गतवर्षीप्रमाणे असावेत, या मागणीचे निवेदन ‘कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटने’ने राज्‍य नियोजन मंडळाचे अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांना दिले. श्री. क्षीरसागर यांनी ‘मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून प्रतिवर्षाप्रमाणे सवलत मिळवून देऊ’, असे आश्‍वासन संघटनेला दिले.

या प्रसंगी कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेचे अध्‍यक्ष श्री. युवराज मोळे, संस्‍थापक श्री. सुभाष जाधव, सरचिटणीस श्री. गजानन विभुते, सर्वश्री अच्‍युतराव साळोखे, चेतन पवळ, सुशांत पाटील उपस्‍थित होते.