महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

‘कोल्‍हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. प्रत्‍येक वर्षी ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्‍ये देवीचा उत्तरायणातील किरणोत्‍सव असतो, तसेच दक्षिणायनात ९, १० आणि ११ नोव्‍हेंबर या तीन दिवसांमध्‍ये देवीचा दक्षिणायनातील किरणोत्‍सव असतो. या सोहळ्‍याच्‍या वेळी मावळतीचे सूर्यकिरण महाद्वारातून श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात प्रवेश करून पहिल्‍या दिवशी तिचे चरण, दुसर्‍या दिवशी तिचे पोट आणि छाती अन् तिसर्‍या दिवशी तिचे मुख आणि तद़्‍नंतर संपूर्ण मूर्ती यांना स्‍पर्श करतात. सूर्यकिरणाने देवीच्‍या मूर्तीला स्‍पर्श करण्‍याच्‍या आधी मंदिरातील सर्व विद्युत् दीप मालवून मंदिराच्‍या गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्‍या जातात. वर्षातून दोन वेळा होणार्‍या या किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व येथे लेखबद्ध केले आहे. या लेखाच्‍या पूर्वार्धात ९ नोव्‍हेंबर या दिवशी आपण किरणोत्‍सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/735907.html

श्री महालक्ष्मीदेवी

५. किरणोत्‍सवामुळे सूक्ष्म स्‍तरावर देवीच्‍या मूर्तीवर होणारी प्रक्रिया आणि देवीच्‍या भाविकांना आध्‍यात्मिक स्‍तरावर होणारा लाभ

किरणोत्‍सवाच्‍या वेळी सूर्यनारायण आणि अग्‍निनारायण यांची विविध रूपे कार्यरत होऊन ते त्‍यांचे दिव्‍य तेज देवीच्‍या मूर्तीमध्‍ये संक्रमित करून देवीच्‍या मूर्तीतील सुप्‍तावस्‍थेतील देवीतत्त्व जागृत करतात. या सूक्ष्म प्रक्रियेचे सविस्‍तर विवरण पुढील कोष्‍टकात दिले आहे.

टीप – एका मतानुसार श्री महालक्ष्मीदेवीचे वाहन घुबड आहे, तर दुसर्‍या विचारसरणीनुसार तिचे वाहन पांढरा हत्ती किंवा गरुड आहे.

६. देवीचा उत्तरायणातील किरणोत्‍सव आणि देवीचा दक्षिणायनातील किरणोत्‍सव यांच्‍यातील आध्‍यात्मिक स्‍तरावरील भेद !

७. तात्‍पर्य

कु. मधुरा भोसले

उत्तरायणाच्‍या किरणोत्‍सवाच्‍या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचे तारक रूप आणि दक्षिणायनातील किरणोत्‍सवाच्‍या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचे मारक रूप अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्‍यामुळे देवीच्‍या मूर्तीतून दक्षिणायनातील किरणोत्‍सवाच्‍या वेळी शक्‍तीच्‍या लहरींचे आणि उत्तरायणातील किरणोत्‍सवाच्‍या वेळी भावाच्‍या लहरींचे प्रक्षेपण अधिक प्रमाणात होते.

अशा प्रकारे श्री महालक्ष्मीदेवीच्‍या किरणोत्‍सवामुळे देवीची मूर्ती अधिक प्रमाणात जागृत झाल्‍यामुळे तिचा लाभ समस्‍त भाविकांना विविध स्‍तरांवर होतो. ‘देवीचा किरणोत्‍सव’, हा एक प्रकारे ‘आनंदोत्‍सवच’ असतो. त्‍यामुळे देवीचा किरणोत्‍सव झाल्‍यानंतर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो आणि किरणोत्‍सवाची सांगता होते.

८. कृतज्ञता

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या कृपेमुळेच ‘तिच्‍या किरणोत्‍सवामुळे आध्‍यात्मिक स्‍तरावर घडणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि तिचे आध्‍यात्मिक महत्त्व लक्षात आले’, यासाठी मी देवीच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. अंबाबाईची कृपा आम्‍हावर अशीच होत राहू दे आणि तिच्‍या कृपाशीर्वादाने भूतलावर लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होऊ दे’, अशी तिच्‍या पावन चरणी आर्त प्रार्थना आहे.’                                             (समाप्‍त)

– कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.