‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत रशियामध्ये मुसलमानांचे विमानतळावर आक्रमण

इस्रायली नागरिक आणि ज्यू धर्मीय विमानाद्वारे पोचल्याच्या अफवेचा परिणाम !

(‘अल्लाहू अकबर’ म्हणजे ‘अल्ला महान आहे’)

मॉस्को (रशिया) – ‘रशियाच्या मखाचकाला या मुसलमानबहुल शहरातील दागेस्तान विमानतळावर इस्रायलचे नागरिक असणारे जू धर्मीय विमानाद्वारे पोचले आहेत’, अशी अफवा पसरल्यानंतर येथील मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत विमानतळावर आक्रमण केले. ते धावपट्टीपर्यंत घुसले होते. यानंतर येथील विमानांची वाहतूक थांबवण्यात आली. आक्रमणाच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. इस्रायलची राजधानी तेल अविव येथून या विमानतळावर एक विमान येणार होते; मात्र या घटनेनंतर ते अन्य शहराकडे वळवण्यात आले.

आक्रमणाच्या घटनेविषयी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की, रशियातील अधिकारी सर्व इस्रायली नागरिक आणि ज्यू धर्मीय यांचे रक्षण करतील आणि दंगलखोरांवर कारवाई करतील.

आम्ही ज्यू धर्मियांच्या समवेत ! – अमेरिका

ज्यू धर्मियांच्या संदर्भातील अमेरिकेच्या सरकारच्या विशेष प्रतिनिधी डेबरा लिपस्टाड यांनी रशियातील विमानतळावर झालेल्या आक्रमणाविषयी सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका इस्रायल आणि ज्यू धर्मीय यांच्यासमवेत उभी आहे. आम्ही ज्यू धर्मियांवरील आक्रमण सहन करणार नाही.

संपादकीय भूमिका

पॅलेस्टिनी लोकांसाठी अश्रू ढाळणारे ज्यू धर्मियांच्या संदर्भातील अशा घटनांविषयीमात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !